Maharashtra Politics: अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शहांसमोर रडले; विजय वडेट्टीवार यांचा दावा

Vijay Wadettiwar News: शिंदे गटामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत, अशी तक्रारही अजित पवार यांनी अमित शहांकडे केल्याची माहिती आहे.
Vijay Wadettiwar reaction on Ajit Pawar Meet Amit Shah Delhi CM Eknath Shinde Maharashtra Politics
Vijay Wadettiwar reaction on Ajit Pawar Meet Amit Shah Delhi CM Eknath Shinde Maharashtra Politics
Published On

Vijay Wadettiwar on Ajit Pawar

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गटात पुन्हा वाद सुरू असल्याच्या चर्चा आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

शिंदे गटामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत, अशी तक्रारही अजित पवार यांनी अमित शहांकडे केल्याची माहिती आहे. दरम्यान, याविषयी माध्यमांनी विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vijay Wadettiwar reaction on Ajit Pawar Meet Amit Shah Delhi CM Eknath Shinde Maharashtra Politics
Maratha Aarakshan: ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा चौथा बळी; चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची तक्रारच केली आहे. मला कुणीतरी सांगितलं, की अजित पवार अमित शहांसमोर रडले, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्यांना रडवून-रडवून सडवतात. आता हीच स्थिती अजित पवार यांच्यासमोर आली असावी, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीमध्ये धमक दाखवून अजित पवार (Ajit Pawar) सर्व तिजोरी साफ करीत होते. आता या सरकारमध्येही तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडेच आहे, ती धमक त्यांनी इथे दाखवावी, असंही वडेट्टीवार म्हणाले.

निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिम्मत तुमच्यामध्ये आहे का? असा सवालही वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना विचारला. दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे आपली दादागिरी दाखवूच शकत नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर केली आहे.

अजित पवार यांनी शहांकडे शिंदेंची तक्रार केली?

मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या निमित्ताने झालेला वाद हा उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावरच पडणार असून, मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच त्यांच्या लोकसभा मतदारसंघात याचा फटका बसेल, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा कयास आहे.

आमदार निधीवाटपावरुन अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. अजित पवार गटातील अनेक आमदारांच्या निधीबाबत हात आखडता घेतला जात आहे,असं अजितदादांनी अमित शहांना सांगितलं असल्याची माहिती आहे. आमदारांना छोट्या-मोठ्या कामांसाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागत असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे.

Vijay Wadettiwar reaction on Ajit Pawar Meet Amit Shah Delhi CM Eknath Shinde Maharashtra Politics
IND vs NZ Semifinal: टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार? न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com