Maharashtra NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यापासून दोन गटांमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळत आहेत. एकीकडे कार्यकर्त्यांमध्येही संघर्ष होत असतानाच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्या ट्वीटरवॉरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या सविस्तर...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना फोन करुन शिविगाळ करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फोन करणारी व्यक्ती शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावरुन अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर आमदार रोहित पवार व जितेंद्र आव्हाड या दोघांनाही टॅग करत या व्यक्तीला समज देण्यास सांगितले आहे.
"आपल्या नावाने आपले कार्यकर्ते अत्यंत खालच्या पातळीवर माझ्या आई बहिणीवर शिवीगाळ करतो आहे . निश्चितच हे कार्यकर्ते तुमचे नसावेत, तरीही एकदा आपण तपासावे त्यासाठी नंबर दिलाय आणि असतील तर योग्य संस्कार द्यावेत..." असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे. यावर आव्हाडांनी आमच्या दोघांचा काय संबध, उगाच आम्हाला जोडू नका. आमचे कार्यकर्ते देतील ते नाव घेऊन देतील.. असे प्रत्यूत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) या उत्तरावर पुन्हा मिटकरींनी "आपले नाव घेऊनच शिवीगाळ झाली आहे. कदाचित तुमचे कार्यकर्ते नसतीलही पण असतील तर समज द्या. तसे तुमचे कार्यकर्ते खूप सज्जन आहेत, आपण "संविधानाला" मानता म्हणून आपल्याला विनंती केली आहे... असा टोला लगावला आहे. थोडक्यात कार्यकर्त्याच्या कॉलमुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.