सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी नाशिकमध्ये वाहतुकीत मोठे बदल
नाशिक ते त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी पर्यायी मार्ग पोलिसांनी सांगितले
३१ ऑक्टोबरला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतुकित बदल असणार आहेत
नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी साधू महंत नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या नाशिकच्या रामकुंडावर हा ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येखील पवित्र कुशवर्त कुंड आणि नवीन घाटावर भव्य ध्वजारोहण सोहळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडावरील धर्मध्वजारोहणाची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. या ध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. त्यासाठी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांना ३० किलोमीटरचा प्रवास जास्त करावा लागेल. या सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नाशिकच्या वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी नाशिक-पिंपळगाव बहुला-संदीप फाऊंडेशन-खंबाळे-पेगलवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर या मार्गाने न जाता अमृत चौक-बारदान फाटा-गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवगाव-वाघेरा फाटा-अंबोली फाटा-सापगाव-त्र्यंबकेश्वर या पर्यायी मार्गाचा वापर करावा. हा मार्ग ५५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे अंतर महामार्गाने फक्त २८ ते ३० किमी इतकेच आहे. पण पर्यायी मार्गामुळे हे अंतर वाढणार आहे.
मुंबईकडून येणाऱ्या वाहनांनी वैतरणा फाटा मार्ग-पहिने-त्र्यंबकेश्वर किंवा मगईऐवजी वैतरणा फाटा-नाशिक-अमृतगार्डन-बारदान फाटा-गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-त्र्यंबकेश्वर या मार्गाने जावे. तर, पहिने-पेगलवाडी-नाशिक या मार्गावरील वाहतुकीसाठी पहिने-आहर्ली-सांजेगाव-वाडीव-हे-नाशिक, तर पहिने-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर मार्गासाठी पहिने-मेलमाळ-निरगुद पाडा-जांभूळपाडा-सापगाव-त्र्यंबकेश्वर या मार्गाने प्रवास करावा.
त्र्यंबकेश्वर ते नाशिक असा परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन प्रवास करावा. त्र्यंबकेश्वरवरून नाशिककडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जव्हार मोखाडा-अंबोली-त्र्यंबकेश्वर पेगलवाडी-खंबाळे-संदीप फाऊंडेशन-नाशिक किंवा मगईएवजी जव्हार-मोखाडा-अंबोली टी पॉईंट-वाघेरे फाटा-कोने-सापते-देवगाव-गिरणारे-गोवर्धन-नाशिक या मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.