नाशिकला ढगफुटीचा धोका; त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर दोन दिवस बंद, शाळा-महाविद्यालयांनाही सुट्टी

Trimbakeshwar And Saptashrungi Temples Closed : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता वर्तवल आहे. नाशिकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
Trimbakeshwar And Saptashrungi Temples  Closed
NASHIK CLOUDBURST ALERT: TRIMBAKESHWAR & SAPTASHRUNGI TEMPLES CLOSED, SCHOOLS AND COLLEGES DECLARE HOLIDAYsaam tv
Published On
Summary
  • अतिमुसळधार पाऊस आणि ढगफुटीसदृश परिस्थितीचा इशारा

  • सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिरे दोन दिवसांसाठी बंद

  • नाशिकमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहराच्या पश्चिम भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.तर काही भागात ⁠ढगफुटी होऊ शकते. जवळपास 300 मिमी पाऊस होऊ शकतो. त्यामुळे ⁠नाशिकमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहेत. दरम्यान पावसाचे अलर्ट ⁠8 तारखेपर्यंत असल्यानं,नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

Trimbakeshwar And Saptashrungi Temples  Closed
मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; दोन दिवस नागरिकांनो घराबाहेर पडू नका, CM फडणवीसांचे आवाहन

दरम्यान काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राज्य सरकारच्या सूचनांनुसार आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी बंद

अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजित पूजा विधी पार पडल्यानंतर मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. यासह सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्थाही तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. भाविकांनी या कालावधीत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Trimbakeshwar And Saptashrungi Temples  Closed
मोठी बातमी! किल्ले, धरणं, धबधबे सर्व पर्यटकस्थळं बंद; ठाणे प्रशासनाचा मोठा निर्णय

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या भागातील आठवडी बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासह प्रशासनाने शेतकऱ्यांना शेतात न जाण्याचा सल्लाही दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने पूराचा धोका असलेल्या गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा किंवा पूर येण्याचा धोका आहे, अशा रस्त्यांची पाहणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com