मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; दोन दिवस नागरिकांनो घराबाहेर पडू नका, CM फडणवीसांचे आवाहन

Heavy Rain In Mumbai : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, महाराष्ट्र अजूनही 'हाय अलर्ट'वर आहे. मुंबईत भरतीचा इशारा, नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
MAHARASHTRA RAIN ALERT: CM DEVENDRA FADNAVIS URGES CITIZENS TO STAY INDOORS
MAHARASHTRA RAIN ALERT: CM DEVENDRA FADNAVIS URGES CITIZENS TO STAY INDOORS
Published On
Summary
  • पुढील दोन दिवस अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे नागरिकांना आवाहन केले.

  • मुंबईत मोठ्या भरतीचा इशारा, तर नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता

  • राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटना

Summary

राज्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पूरपरिस्थिती,निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ⁠दरड कोसळत आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये ⁠ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. तर मुंबईत 3 वाजल्यापासून समुद्रात मोठी भरती होण्याची शक्यता आहे. इंद्रायणी नदीवरील पुल पाण्याखाली येत असल्याने वारकऱ्यांनी देखील थेट पुण्यात पोहोचावं,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.

MAHARASHTRA RAIN ALERT: CM DEVENDRA FADNAVIS URGES CITIZENS TO STAY INDOORS
Panvel : पनवेलमध्ये मोठी दुर्घटना! दोन मित्र पोहण्यासाठी ओढ्यात उतरले; पुन्हा परतलेच नाहीत

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी सुरु आहे.अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वारा असल्याने ⁠दरड कोसळत आहेत, ⁠आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आपण आढावा घेतला आहे. मुंबईत 3 वाजल्यापासून हायटाईड आहे, ⁠यावेळी पाणी भरण्याची शक्यता आहे, ⁠सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. 40 ते 50 किमी ताशी वारा काल वाहिला.

यात ⁠साडेतीनशे झाडं पडली. ⁠⁠महिनाभरातील पाऊस अवघ्या 4 दिवसांत मुंबईत पडलाय, त्यामुळे हानी होताना दिसून येत आहे. ⁠आजही तीव्र वारा वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

MAHARASHTRA RAIN ALERT: CM DEVENDRA FADNAVIS URGES CITIZENS TO STAY INDOORS
Rain Alert : पावसाचं रौद्ररूप! मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता

नाशिकमध्ये देखील अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकमध्ये ⁠ढगफुटी होऊ शकते. जवळपास 300 मिमि पाऊस होऊ शकतो. त्यामुळे, ⁠नाशिकमध्ये सर्वांना सुट्टी दिली आहे, सध्या तेथेही प्रशासन सज्ज आहे. ⁠8 तारखेपर्यंत हे सर्व अलर्ट आहेत, त्यामुळे नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com