रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट
पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे
नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन.
Maharashtra Rain Alert News राज्यात गेले काही दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. आज रायगड जिल्ह्यासह नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी काही तासांत अती मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या विभागातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.