Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...

Nashik Crime News: नाशिकमध्ये एका महिलेसोबत भयंकर घटना घडली. आजार बरा करतो सांगत भोंदूबाबाने अघोरी पूजा करत महिलेसोबत भयानक कृत्य केले.
Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...
Nashik Crime NewsSaam Tv
Published On: 
  • नाशिकमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलेसोबत भयंकर कृत्य केले

  • पैशांचा पाऊस पाडतो सांगत महिलेची साडेसात लाखांची फसवणूक

  • आजार बरा करतो सांगत महिलेसोबत भयंकर कृत्य केले

नाशिकमधील भोंदूबाब अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता आणकी एका भोंदूबाबाचं भयंकर कांड समोर आले आहे. या भोंदूबाबाने महिलेची फसवणूक केली. आजार बरा करतो आणि पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून त्याने अघोरी पूजा केली आणि महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या पाऊस पाडतो असे आमिष दाखवत भोंदूबाबाने पीडितेची अर्धनग्न पूजा केली. आजाराने त्रस्त महिलेचा पूजाविधीने आजार बरा करतो असे आश्वासन या भोंदूने महिलेला दिले होते. दैवी-अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने त्याने महिलेची फसवणूक केली. पीडितेला अर्ध नग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी भोंदूविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...
Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

पनवेलच्या अस्थमा झालेल्या पीडितेची आजार बरा करून देण्यासह पैशांच्या पावसाचं आमिष दाखवत नाशिकच्या गंगापूर शिवारात अघोरी पूजाविधी करण्यात आला. मात्र आजार बरा न झाल्याने तसंच पैशांचा पाऊस न पडल्यानं फसवणूक झाल्याचं पीडितेच्या लक्षात आले. त्यानंतर पीडित महिलेने गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भोंदू अरुण पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला.

Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...
Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

दरम्यान, या प्रकरणातील संशयित भोंदू बाबा अरुण पाटील याच्याकडून खुलासाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा असल्याचा दावा त्याने केला आहे. स्थानिक उबाठा गटाचे पदाधिकारी विशाल कदम यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केल्याचा दावा देखील अरुण पाटीलने केला.

Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...
Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com