Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

Pune Police: पुण्यामध्ये आयटी इंजिनिअर महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा
Pune News Saam Tv
Published On: 
  • पुण्यात आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या

  • त्रिष्णा सकपाळने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं

  • महिला इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

  • पगार आणि घर नावावर करण्यासाठी छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटालून आयटी इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. पुण्यातील मुंढवामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या नवऱ्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण पगार देण्यासोबत माहेरचे घर नावावर करून देण्यासाठी या महिलेचा छळ केला जात होता. सततच्या छळाला कंटाळून या महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिष्णा राहुल सकपाळ असं आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनिअर महिलेचे नाव आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास त्रिष्णाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्रिष्णा मुंढव्यातील केशवनगर भागात राहत होती. माहेरहून पैसे आण, घर नावावर करून दे आणि घटस्फोटासाठी त्रिष्णाचा तिचे सासरची मंडळी शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. या छळाला कंटाळून त्रिष्णाने आयुष्य संपवलं.

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा
Kalyan Crime : कल्याण स्टेशन परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या गँगची पोलिसांनी काढली धिंड

याप्रकरणी त्रिष्णाच्या वडिलांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे.

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा
Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

त्रिष्णाचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने तिला दिले होते. त्रिष्णा ही एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. संपूर्ण पगार देण्यासह माहेरचे घर सासूच्या नावावर करण्यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. तसेच, सासऱ्यांनी तिच्या नावावर एक कोटीचे घर घेऊन देण्याचा तगादा लावला होता. वारंवार होणाऱ्या मारहाण आणि छळामुळे त्रिष्णा आणि तिचान नवरा २०२१ मध्ये केशवनगर येथे वेगळे राहू लागले.

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा
Crime: बायको प्रियकरासोबत पळाली, शुद्धीकरणाऱ्या नावाखाली सामूहिक बलात्कार; नवऱ्यासह ९ जणांना अटक

मात्र, तिथेही तिच्या नवऱ्याने मारहाण करत तिला घराबाहेर काढले. त्यामुळे त्रिष्णा माहेरी निघून आली होती. त्यानंतर नवऱ्याने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात 'पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेसासू यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून तेच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत,' असा तिने सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा
Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com