Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

Kankavali Crime: कणकवलीतील जंगलामध्ये महिला पोलिसाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात आता तिच्या पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?
Women Police DeathSaam Tv
Published On: 
  • सिंधुदुर्गमध्ये महिला पोलिस स्मिता माने मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

  • स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवे वळण

  • महिला पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक

  • बिडवाडी हुंबरणे जंगलात महिला पोलिसाचा मृतदेह आढळला होता

विनायक वंजारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये महिला पोलिसाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत या महिला पोलिसाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाच्या पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली. या महिला पोलिसाच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली. तिचा नवरा देखील पोलिसच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळालं आहे. स्मिता माने यांचे पती आणि स्वतः पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या सचिन मानेला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी–हुंबरणे येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने पोलिस दलासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?
Crime: बायको प्रियकरासोबत पळाली, शुद्धीकरणाऱ्या नावाखाली सामूहिक बलात्कार; नवऱ्यासह ९ जणांना अटक

स्मिता माने यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पती सचिन माने हा स्मिता यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली किंवा घातपाताने त्यांची हत्या करण्यात आली, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री सचिन मानेला बेड्या ठोकल्या. सचिन मानेला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?
Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com