Kankavli Railway Station
Saam Tv

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

Kankavli Railway Station: कणकवली रेल्वे स्थानकात तिकीट रांगेत पुढे जाण्याच्या वादातून दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना घडल्यामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण होते. सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
Published on

Fighting Viral Video: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या कणकवली रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तुतारी एक्सप्रेस स्थानकात दाखल होण्याच्या वेळेआधीच ही घटना घडल्यामुळे काही काळासाठी रेल्वेस्थानकावरील वातावरण तणावग्रस्त झाले होते.

तुतारी एक्सप्रेस (Express) कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली असतानाच तिकीट रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने कणकवली रेल्वेस्थानकावर होते. परिणामी तिकीट काऊंटरसमोरही मोठी रांग लागली होती.

याच रांगेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न एका तरूणाने केला. याचाच दुसऱ्या तरुणाला राग आला. याचाच परिणाम हाणामारीत झाला. या हाणामारीमुळे रेल्वेस्थानकावरील वातावरण काहीसे तणावग्रस्त झाले होते. पुढे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मारामारी सोडवली.

सर्व घटना तेथिल एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) होत आहे. त्यानंतर या नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही यूजर्संनी ही हाणामारी पाहून डोक्याला हात मारला आहे तर काहींनी राग व्यक्त केलेला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Kankavli Railway Station
बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com