Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Pimpri Chinchwad Nigdi Crime : पुण्यातील निगडी परिसरातील एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर एका कामगारानं अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
निगडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद, परिसरात संताप
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली. saam tv
Published On: 

गोपाल मोटघरे, पिंपरी - चिंचवड, साम टीव्ही

पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आला आहे. येथील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका कामगारानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत लज्जास्पद प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पीडित मुलगी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिला एकटीला बघून आरोपी कामगाराने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा येथील एका ठेकेदाराकडे रोजंदारीचं काम करतो. मंदिरात मुलीने दर्शन घेतल्यानंतर ती बाहेर जात असतानाच आरोपी तेथे आला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

निगडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद, परिसरात संताप
Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

मुलीने त्याला प्रतिकार केला. ती जोरजोरात रडू लागली. तिचा आवाज ऐकून कुणीतरी मंदिरात येईल या भीतीने आरोपीने तेथून लगेच पळ काढला. हा अत्यंत लज्जास्पद प्रकार मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

निगडी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी कामगाराला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात विनयभंग आणि विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

११ तारखेला निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी हा मजूर आहे. तो एका ठेकेदाराकडे मजुरीचे काम करतो. त्याला अटक करण्यात आली आहे.

महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक, निगडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com