Leopard Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : भक्ष्य तोंडात पकडून बिबट्याचा मुक्त संचार; सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद 

Nashik News : देवळाली कॅम्प येथील लष्करी परिसर आणि आसपासच्या दाट झाडीमुळे या ठिकाणी अनेकदा बिबट्यांचा संचार आढळून येतो. बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीकडे येतात

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : काही दिवसांपूर्वीच नवले मळा परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला जेलबंद करण्यात यश मिळाले होते. यानंतर आता (Nashik) नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एक (Leopard) बिबट्या थेट भक्ष्य तोंडात पकडून मुक्त संचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे. (Live Marathi News)

नाशिकच्या देवळाली परिसरातील खंडोबा टेकडीजवळच्या रस्त्यावर एक बिबट्या तोंडात भक्ष्य घेऊन रस्त्याने फेरफटका मारतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. देवळाली कॅम्प येथील लष्करी परिसर आणि आसपासच्या दाट झाडीमुळे या ठिकाणी अनेकदा बिबट्यांचा संचार आढळून येतो. बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीकडे येतात. त्यापैकीच हा बिबट्या असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. शनिवारी रात्रीच्या सुमारास काही नागरिकांना मुक्त संचार करत असलेला हा बिबट्या दिसला. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये देखील भीती निर्माण झाली. या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बंगल्याच्या आवारात बसून भक्ष केले फस्त

देवळाली परिसरात बिबट्या भक्ष घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नाशिक रोड परिसरात असलेल्या जय भवानी रोड येथील गुलमोहर कॉलनी परिसरात शिवम बंगल्याच्या आवारात बिबट्याचे दर्शनझाले. जवळपास एक तास हा बिबट्या बंगल्याच्या आवारातच ठाण मांडून होता. एवढेच नाही तर या बिबट्याने मांजरीचे पिल्लू बंगल्याच्या आवारात बसून फस्त केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

SCROLL FOR NEXT