Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : चॉपरने केक कापणे पडले महागात; बर्थ डे बॉयला घेतले ताब्यात

Nashik Crime : क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाला चॉपरने केक कापणारा आणि कमरेला चॉपर लावून दहशत निर्माण करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरवात केली

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: वाढदिवस असल्याने मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यात बर्थ डे बॉयना केक कापण्यासाठी चॉपरचा वापर केला. इतकेच नाही तर त्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र चॉपरने केक कापणे बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे.

नाशिक शहरात हा प्रकार समोर आला आहे. वाढदिवस साजरा करताना चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बर्थडे बॉयचा शोध घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाला चॉपरने केक कापणारा आणि कमरेला चॉपर लावून दहशत निर्माण करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरवात केली होती. 

युवकाला ताब्यात घेत चॉपर जप्त 

क्राईम ब्रांच युनिट एकच्या पथकाने पोलिसांनी सापळा रचून गजानन गणेश शेळके या वीस वर्षीय बर्थडे बॉयला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून स्टीलचा धारदार चॉपर देखील जप्त करण्यात आला आहे.

गावठी कट्टा बाळगणारा एकजण ताब्यात 

शिर्डी : गावठी कट्टा बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथून जेरबंद केले. अमोल दिवे या तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी परिसरात सापळा रचून दिवे याला एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह जेरबंद केले. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाईचा धडाका सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

SCROLL FOR NEXT