Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील २१ केंद्रांवर होणार तूर खरेदी; २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत

Dharashiv News : हमीभाव खरेदी केंद्रांवर रांगा लागून देखील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरकारी दर मिळाला नाही. त्यातच पणन महासंघाने आता तूर खरेदीचे नियोजन केले असून जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रांवर ही खरेदी केली जाणार
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: तूर काढणीला आता सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी तूर विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहेत. त्यानुसार पणन महासंघाने तूर खरेदीचे नियोजन केलं असून यासाठी २२ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. याकरिता धाराशिव जिल्ह्यात २१ केंद्रांवर हमी भावाने तुरीची खरेदी केली जाणार आहे. २२ फेब्रुवारीनंतर तूर खरेदीला सुरवात केली जाणार आहे. 

एकीकडे हमीभाव खरेदी केंद्रांवर रांगा लागून देखील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरकारी दर मिळाला नाही. त्यातच पणन महासंघाने आता तूर खरेदीचे नियोजन केले असून जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रांवर ही खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रतिक्विंटल ७ हजार ५५० रुपये दर देखील यापूर्वी जाहीर देखील करण्यात आला आहे. अर्थात शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या दरात तूर विक्री करता येणार आहे. 

Dharashiv News
Ambernath Crime: पार्टीच्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

नोंदणीचे आवाहन 

पणन महासंघाकडून तूर खरेदीसाठी केंद्र सुरु करण्यात येत असून या केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकर्यांकडीलच तूर खरेदी केली जाणार आहे. या करीत २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घेण्याचे आवाहन पणन अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Dharashiv News
Ulhasnagar News : १०८ रुग्णवाहिकेचा गरिबांच्या आरोग्याशी खेळ; दुपारी कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका सायंकाळी दाखल, रुग्णाचा मृत्यू

वाशिमच्या बाजार समितीत चीया पिकाची ८५० क्विंटलची आवक
वाशीम : वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच शनिवारी ८५० क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती. ११ फेब्रुवारीला मुहूर्ताच्या खरेदीवर चीयाला पिकाला २३ हजार १ रुपयांचा विक्रमी भाव मिळाला होता. त्यानंतर दर शनिवारी चिया पिकाची खरेदी वाशिमच्या बाजार समितीत सुरू झाली. पहिल्याच शनिवारी शेतकऱ्यांनी ८५० क्विंटल चिया विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणला होता. यावेळी चिया पिकाला १२ हजार रुपये ते १३ हजार १०० रुपये पर्यंतचा दर मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com