5 People Injured After Two Groups Fight In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा, गोळीबार आणि कोयत्याने वार; 5 जखमी

5 People Injured After Two Groups Fight In Nashik: नाशिकमध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यादरम्यान गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले.

Priya More

तरबेझ शेख, नाशिक

टीम इंडियाने (Team India) टी- २० वर्ल्ड कप (T-20 World Cup) जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अशात नाशिकमध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यादरम्यान गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. यामधील एकाच्या पायाला गोळी लागली. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नाशिकरोड परिसरात मध्यरात्री तरुणांनी मोठ्यासंख्येने एकत्र येत जल्लोष केला. यावेळी दोन गटामध्ये तुफान राडा झाला. या राड्यात बंदुकीतून गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला. गोळीबारामध्ये एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. या राड्यामध्ये देवळाली गाव आणि विहितगाव येथील ५ जण जखमी झालेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २४ तासांत नाशिकरोड परिसरात ही दुसरी मोठी घटना घडली. विहितगावचे जमधडे, हांडोरे यांच्या गटात राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राड्यात जखमी झालेल्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक रोड परिसरात कोयता आणि बंदुकीचा सर्रास वापर टवाळखोरांकडून केला जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

SCROLL FOR NEXT