Beed Firing News : बीडच्या परळीत मध्यरात्री गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

Beed Parali Firing News : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच जागीच ठार झाले आहेत.
Beed Parali Firing News
Beed Parali Firing NewsSaam TV

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच जागीच ठार झाले आहेत. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Beed Parali Firing News
Bhandara News : लग्नासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू

बापू आंधळे असं मृत सरपंचाचं नाव असून ग्यानबा गित्ते असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरपंच बापू आंधळे हे अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते होते. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. नेमका गोळीबार कोणत्या कारणातून झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सरपंच बापू आंधळे आणि ग्यानबा गिते परिसरात उभे असताना अचानक अज्ञात हल्लेखोर आले. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात सरपंच बापू यांना गोळी लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर ग्यानबा गित्ते गोळीबारात जखमी झाले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोळीबाराची माहिती मिळताच परळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत बापू आंधळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून ग्यानबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर रात्री उशिरा बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर रात्रीपासूनच परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मयत बापू आंधळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचे समजते आहे.

Edited by - Satish Daud

Beed Parali Firing News
Pune Accident VIDEO : पुण्यात पुन्हा भीषण अपघात, अल्पवयीन मुलाने टँकर चालवला; पती-पत्नीसह अनेकांना उडवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com