Eknath Shinde  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यात शिवसेनेने खातं उघडलं, निवडणुकीपूर्वीच शिंदेचा उमेदवार झाला नगरसेवक

Nashik Local Elections: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाने राज्यात पहिलं खातं उघडलं आहे. निवडणुकीपूर्वीच शिंदेचा उमेदवार नगरसेवक झाला. खान जुबेदाबी यांची नांदगावमधून नगरसेवकपदासाठी बिनविरोध निवड झाली.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये शिंदे गटाचा पहिला नगरसेवक निवडणूक न होताच निवडून आला

  • खान जुबेदाबी यांची बिनविरोध नगरसेवकपदावर निवड

  • हे निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसाठी मोठे राजकीय यश आहे

नाशिक जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाने खातं उघडलं आहे. राज्यात शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी यांची नांदगावमधून नगरसेवकपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नांदगाव नगरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ 'ब'मधून शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी गफार खान यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने नांदगाव नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध ठरला. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात ही बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, नांदगाव नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेश कवडे आणि सागर हिरे यांनी अर्ज दाखल केला होता. पण छाननी प्रक्रियेमध्ये राजेश कवडे यांना मोठा धक्का बसला. नांदगावातून आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सागर हिरे यांना न्याय मिळाला. शिवसेना शिंदे गट- भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ सागर हिरे यांच्या गळ्यात पडली.

छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेले राजेश कवडे यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून अवैध ठरवण्यात आला. तर सागर हिरे यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून वैध ठरवण्यात आला. सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर सुहास कांदे समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. नगरपरिषद कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli: सरकारी कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, तरुणाने संपवलं आयुष्य; हिंगोलीत खळबळ

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, इंजिनिअरने २ दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये हळदीची आवक वाढली

High cholesterol symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा शरीरात साचतंय खराब कोलेस्ट्रॉल, वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

उन्हाच्या तडाख्यात गारवा! मुंबई-कोकणात वादळी पावसाचा इशारा; वाचा IMD नं काय वर्तवला अंदाज?

SCROLL FOR NEXT