Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Tanmay Vekaria Father Death : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले, जे स्वतः उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक होते. दिग्दर्शकाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Tanmay Vekaria Father Death
Actor DeathSAAM TV
Published On

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत काम करत असलेला बाघा म्हणजेच तन्मय वेकारियाच्या वडिलांचे निधन झाले आहे. तन्मय वेकारियाचे वडील अरविंद वेकारिया हे ज्येष्ठ गुजराती अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

TOI च्या वृत्तानुसार, अभिनेते अरविंद वेकारिया यांचे निधन बुधवारी झाली. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद वेकारिया हे गुजराती रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. तन्मय वेकारियाच्या आईचे देखील आठ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे आता वडीलांच्या निधनाने अभिनेत्याल मोठा धक्का बसला आहे. अरविंद वेकारिया यांच्या निधनाची बातमी समजताच कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अरविंद वेकारिया कोण होते?

अरविंद वेकारिया हे उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी गुजराती रंगभूमीवर आपल्या कामाने वेगळीच छाप पाडली. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. 'यशोदा', 'छानू चमकलो' आणि 'रुपियो नाच नचावे' यांसारख्या गुजराती नाटकांत आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. अरविंद वेकारिया हे 'तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातही दिसले होते. त्याचा कॅमिओ होता. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका भागात अरविंद वेकारिया यांनी एका सराफाची (दागिने विक्रेत्याची) भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी 'शक्तिमान' या लोकप्रिय मालिकेतही काम केले आहे.

अलिकडेच एका शोच्या चित्रीकरणादरम्यान आपल्या आईची आठवण येऊन तन्मय भावुक झाला होता. तन्मय सेटवर आईच्या आठवणीत रडू लागला. त्यामुळे थोडा वेळ शूटिंग थांबले याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरविंद वेकारिया यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Tanmay Vekaria Father Death
Shraddha Kapoor - Eetha : तैयार हो, आ रही है 'ईठा'; श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी पाहून प्रेक्षकांची विकेट पडली, चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com