TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकाराची अचानक तब्येत बिघडली; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधील लोकप्रिय अभिनेत्याची प्रकृती अचानक खराब झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv
Published On

TMKOC Sodhi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते गुरुचरण सिंह यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुचरण सिंह यांचा रुग्णालयातला व्हिडीओ समोर आला आहे. यात गुरुचरण यांची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गुरुचरण सिंह हे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

गुरुचरण सिंह यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी चाहत्यांनी तब्येतसंबंधित माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये गुरुचरण रुग्णालयाच्या बेडवर बसल्याचे पाहायला मिळते. ते फार अशक्त दिसत आहेत. त्यांनी व्हिडीओमध्ये 'माझी अवस्था खूप खराब झाली आहे, सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत', असे म्हटले आहे.

दरम्यान या व्हिडीओमध्ये गुरुचरण सिंह यांनी आजारपणाचे कारण सांगितले नाही. लवकरच ते कारण चाहत्यांना लवकरच सांगेन असेही त्यांनी म्हटले आहे. गुरुचरण यांची तब्येत बिघडल्याने त्यांचे चाहते चिंतातूर झाले आहेत. चाहत्यांनी कमेंट करत त्यांची विचारपूस केल्याचे पाहायला मिळते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

मागच्या वर्षी गुरुचरण सिंह अचानक राहत्या घरातून गायब झाले होते. तब्बल २५ दिवसांनी ते घरी परतले. या २५ दिवसांमध्ये ते कुठे होते याची माहिती कुणालाही नव्हती. त्यांच्या वडिलांना पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. गुरुचरण यांच्यावर कर्ज होते. पैसे फेडणे शक्य होत नसल्याने तणावाखाली ते घर सोडून गेले होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Pushpa 2 - Allu Arjun: पुष्पा २ स्क्रीनिंगवेळी चेंगराचेंगरीतील जखमी मुलाचं काय झालं? अल्लू अर्जुननं अचानक घेतली भेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com