
पुष्पा 2 च्या स्क्रिनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. यावेळी एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. अभिनेता अल्लू अर्जुनने मंगळवारी बेगमपेट येथील KIMS रुग्णालयात संध्या थिएटर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या श्रीतेज या १० वर्षीय बालकाची भेट घेतली. जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्याने रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी मुलाची भेट घेतली.
अल्लू अर्जुनने घेतली मुलाची भेट
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2'च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी मृत महिलेचे मूल जखमी झाले होते. जखमी मुलावर बेगमपेट येथील KIMS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, ज्याची अभिनेत्याने मंगळवारी भेट घेतली आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
अल्लू अर्जुनचा जामीन अर्ज
नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनच्या नियमित जामीन याचिकेवर २७ डिसेंबर रोजी सुनावणी केली होती. परंतु, पोलिसांनी जामीन अर्जावर प्रतिवाद करण्यासाठी वेळ मागितला होता, त्यामुळे न्यायालयाने सुनावणी 30 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. यानंतर ३० डिसेंबर रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आणि पोलिसांनी दाखल केलेला प्रतिवाद ऐकून घेतल्यानंतर शुक्रवारी निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी नामपल्ली कोर्टाने चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनचा नियमित जामीन अर्ज स्वीकारला होता.
4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द रुल' च्या प्रीमियर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अभिनेत्याला नामपल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यालयातून त्याला त्याच दिवशी अंतरिम जामीन मिळाला.
आतापर्यंत 'पुष्पा 2: द रुल' या सिनेमाने १२०० कोटींचा टप्पा पार करत बंपर कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशीपासून बाॅक्स ऑफिसवर रेकॅार्ड ब्रेक कमाई केली आहे. चाहत्यांना अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री आवडल्याच दिसून येत आहे.