
मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी योग्य काळजी आणि पोषण आवश्यक आहे. याची सुरुवात गर्भधारणेपासूनच होते. मुलाच्या जन्मानंतर, त्याच्या शारीरिक विकासावर विशेष लक्ष दिले पाहिजे, जसे की निरोगी शरीर, उंची वाढणे, स्नायूंची ताकद यासोबतच मुलाचा मानसिक विकास त्याच्या वयानुसार मंदावणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या वयापासून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया, जेणेकरून त्याच्या वयानुसार त्याची उंची कमी होत नाही आणि तो इतर मुलांपेक्षा लहान राहू नये.
६ महिने ते २ वर्ष
बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी जन्मापासून 2 वर्षांपर्यंतचा हा काळ महत्त्वाचा असतो. बाळाच्या जन्मानंतर 1000 दिवस विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कमीत कमी ६ महिने फक्त आईचेच दूध द्यावे. 6 महिन्यांनंतर, पोषक तत्वांनी युक्त अन्न देणे सुरू करा. या व्यतिरिक्त आपल्या मुलाशी बोलणे, त्याच्या डोळ्यात पाहणे, संगीत ऐकणे आणि खेळण्यांसह खेळणे अशा गोष्टी करा. तसेच, लसीकरण करून घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करा.
३ ते ५ वर्ष
हे वय बालपनाचे असते.या वयात मुलांच्या मोटर स्किल्सचा विकास होतो. या वयात त्यांच्याकडून पळणे, उड्या मारणे, चित्र काढणे, चित्रात रंग भरणे यासारख्या अॅक्टिव्हिटी करुन घ्या. तसेच मुलं या वयात भाषेचे ज्ञान प्राप्त करतात. म्हणून त्यांच्याशी शक्य तेवढे बोला, गप्पा मारा.त्यांना गोष्ट सांगा किंवा त्यांच्यासाठी एखादे पुस्तक वाचा जेणेकरुन त्यांना भाषा समजण्यास सोपे होईल. याशिवाय मुलांना हिरव्या भाज्या, फळे, दूध, आणि प्रोटीनयुक्त आहार द्या. या वयातच मुलांना आत्मनिर्भर बनायला शिकवा. जसे कि स्वतःचे बूट घालणे किंवा हात धुणे.
६ ते १२ वर्ष
या वयात मूल शाळेत जायला लागते. 12 वर्षांपर्यंत मुलांची शारीरिक क्रिया वाढते. त्यांना खेळ, योग आणि इतर शारीरिक अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा आणि मुलांना अभ्यासात रस वाढवण्यास मदत करा. मुलाच्या सामाजिक विकासासाठी हे उचित वय आहे. तसेच त्यांना मित्र बनवणे, टीमवर्क करणे आणि इतरांसोबत राहणे शिकवा.
१३ ते १८ वर्षे
या वयात त्यांना आरोग्य, स्वातंत्र्य आणि शिक्षण तसेच भावनिक आधाराची गरज असते. मुलांना त्यांच्या भावना समजण्यास आणि व्यक्त करण्यास मदत करा. मुलांमध्ये निरोगी जीवनशैली, योग्य खाण्याच्या सवयी आणि व्यायामाची सवय लावा. त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त करा पण त्यांच्यावर लक्ष ठेवा. करिअर आणि जीवनाच्या उद्दिष्टांबद्दल संवाद साधा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited By : Priyanka Mundinkeri