Death News : माजी क्रिकेटपटूवर शोककळा, मोठ्या भावाचं निधन; सोशल मीडियावरून दिली माहिती

Shoaib Akhtar Brother Passes Away : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा भाऊ शाहिद अख्तरचे निधन झाले आहे. फेसबुक पोस्टद्वारे शोएबने ही दुःखद माहिती दिली.
SHOAIB AKHTAR MOURNS DEATH OF ELDER BROTHER SHAHID AKHTAR, CRICKET WORLD PAYS TRIBUTE
SHOAIB AKHTAR MOURNS DEATH OF ELDER BROTHER SHAHID AKHTAR, CRICKET WORLD PAYS TRIBUTEsaam tv
Published On
Summary
  • पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा भाऊ शाहिद अख्तरचे निधन

  • शाहिद अख्तर फिटनेस ट्रेनर आणि फिजिओथेरपिस्ट होता

  • शोएब अख्तरने फेसबुक पोस्टद्वारे भावाच्या निधनाची माहिती दिली

  • आईच्या निधनानंतर अख्तर कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मोठा भाऊ शाहिद अख्तरचे निधन झाले असून ही दुःखद माहिती स्वतः शोएब अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. भावाच्या निधनामुळे अख्तर कुटुंबावर शोककळा पसरली असून क्रिकेट चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाहिद अख्तर फिटनेस ट्रेनर आणि फिजिओथेरपिस्ट होता. शोएबच्या फिटनेसमध्ये त्याचा मोठा खारीचा वाटा होता. क्रिकेटच्या मैदानावर अनेक फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीने हादरवणारा शोएब आज मात्र भावाच्या निधनामुळे पूर्णपणे खचलेला पाहायला मिळाला. यापूर्वी 2021 मध्ये शोएब अख्तरच्या आईचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून सावरत असतानाच आता मोठ्या भावाच्या निधनाने त्याच्या आयुष्यात आणखी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

SHOAIB AKHTAR MOURNS DEATH OF ELDER BROTHER SHAHID AKHTAR, CRICKET WORLD PAYS TRIBUTE
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

शोएब अख्तरने फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या भावाच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की , “अत्यंत दुःखाने मला तुम्हाला कळवावे लागत आहे, माझा मोठा भाऊ शाहिद अख्तर याचे निधन झाले आहे.” यासोबतच अंत्यविधीची वेळ आणि ठिकाणाची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल, असेही त्याने सांगितले.

SHOAIB AKHTAR MOURNS DEATH OF ELDER BROTHER SHAHID AKHTAR, CRICKET WORLD PAYS TRIBUTE
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रीय! २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

कुटुंबातील अत्यंत जवळची व्यक्ती गमावल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोएब अख्तरच्या या दुःखद प्रसंगानंतर जगभरातील क्रिकेट चाहते आणि खेळाडूंनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अनेकांनी शाहिद अख्तर यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com