Ongoing infrastructure work in Nashik ahead of the upcoming Kumbh Mela raises concerns over timely completion. saam tv
महाराष्ट्र

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी 1063 कोटी मंजूर; कोणती कामे होणार?

Nashik Kumbh Mela 1063 Crore Infrastructure Approval Details: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1063 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असली, तरी विकासकामांच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

Omkar Sonawane

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1 हजार 63 कोटी रुपयांच्या कामांना मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली आहे. या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळवण्यासाठी प्रस्तावित कामांना गती मिळावी. भाविकांसाठी वाहनतळ, पाणीपुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी 1 हजार 63 कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजूरीदिली असून ही कामे वेळेत पूर्ण करावी असे निर्देश फडणवीसांनी दिले.

आखाती युद्धाचा परिणाम सिंहस्थांच्या कामांवर

शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू असली, तरी ती उशिराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. अवघ्या वर्षभरावर कुंभमेळा येऊन ठेपला असताना अनेक प्रकल्पांची गती मंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर या कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका स्थानिक पातळीवर बसत असून, त्याचा परिणाम सिंहस्थाच्या कामांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिंहस्थाच्या कामांचे भवितव्य काय, असा प्रश्न साधू-महंतांसह नाशिककरांना पडला आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. या भाविकांसाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू असल्याची टीका होत आहे. शहरात विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खोदकाम सुरू असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामांच्या नावाखाली शहराचे खोदकाम करून ठेवले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, आखाती देशांतील युद्धाचा परिणाम अधिक तीव्र झाला, तर सिंहस्थाच्या तयारीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT