Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गड मंदिरातील तब्बल 22 किलो चांदी गायब, ट्रस्टच्या कारभारावर संशय

Saptashrungi Temple: नाशिकमधील सप्तशृंगी मंदिरातून सुमारे २२ किलो चांदी गायब झाल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे विश्वस्त व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
Saptashrungi Temple:
Investigation underway after 22 kg silver discrepancy found at Saptashrungi Temple.saam tv
Published On
Summary
  • जुन्या नोंदी आणि प्रत्यक्ष मोजणीत तफावत

  • मंदिर ट्रस्टच्या कारभारावर संशय

  • प्रशासनाकडून सखोल चौकशीचे आदेश

सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे २२किलोची तफावत आढळली आहे. या 'चांदी अपहार' प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिलेत.

Saptashrungi Temple:
Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी याबाबत प्रशासनाकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. जुन्या नोंदींनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठी ४०६ किलो चांदी वापरण्यात आली होती. पण प्रत्यक्ष मोजणी केल्यानंतर फक्त ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याची बाब उघडकीस आली. अशा प्रकारे सुमारे २२ किलो ४९०ग्रॅम चांदी गायब झाली आहे. याप्रकरणी २५ मार्च २०२६ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.

Saptashrungi Temple:
खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर भरती प्रक्रियाही होणार ऑनलाईन, संस्थापकांची मनमानीला लगाम

या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवलं. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी यासंदर्भात लेखी आदेश काढलेत. यासह जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.

ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी समितीला दिलेल्या माहितीनुसार, चांदी काढताना योग्य प्रक्रिया पार पडली नाहीये. म्हणजे चांदी काढताना पंचनामा करणे, अधिकृत वजन करणे आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया नियमांनुसार झाली नाही. यामुळे तांत्रिक घोळ नसून नियोजित अपहार असल्याचा संशय बळावलाय.

दरम्यान स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी विधीज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२६ पासून याविरोधात आंदोलन छेडले होतं. पण वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नव्हती. अखेरीस हे प्रकरणाची तक्रार जेव्हा राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे गेली तेव्हा प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com