No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा

Delhi Petrol Diesel Rules : दिल्लीत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नो PUC, नो फ्युएल’ नियमाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. PUC नसलेल्या वाहनांना आता पेट्रोल, डिझेल किंवा CNG मिळणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि वाहन जप्तीची कारवाई होणार आहे.
No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा
Delhi Petrol Diesel New Rules NewsSAAM TV
Published On
Summary
  • दिल्लीत ‘नो PUC, नो फ्युएल’ नियमाची कडक अंमलबजावणी

  • PUC नसलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल मिळणार नाही

  • नियम मोडल्यास दंड आणि वाहन जप्ती

  • प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचे कठोर पाऊल

जर तुम्ही दिल्लीच्या रस्त्यांवर गाडीने प्रवास करत असाल तर थांबा, आधी ही बातमी वाचा. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून,PUC नसलेल्या वाहनांना कोणत्याही पंपावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी देण्यात येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या नियमाबाबत कठोर भूमिका मांडली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा नियम लागू करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले होते. अनेक वाहने अजूनही पीयूसीशिवाय रस्त्यावर धावत असल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याची चिंता सरकारने व्यक्त केली आहे.

No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा
Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

नवीन आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांना वाहनांचे पीयूसी तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे. पीयूसी नसल्यास पेट्रोल, डिझेल, सीएनजी मिळणार नाही. या नियमाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अन्न व पुरवठा विभाग, परिवहन विभाग, महानगरपालिका आणि दिल्ली वाहतूक पोलीस यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून, वाहन जप्ती आणि मोठ्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा
Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

मुख्यमंत्री गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपले पीयूसी वेळोवेळी अपडेट ठेवावे. स्वच्छ आणि निरोगी दिल्लीसाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहनांमधून होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवणे ही सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक गरज बनली असून, सरकार या दिशेने सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राजधानीत प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com