Multiple FIRs filed against Ashok Kharat as investigation into exploitation case intensifies. saam tv
महाराष्ट्र

'शुद्धीकरण तर कोणाला लग्नाचं आमिष'; अशोक खरात लैंगिक अत्याचारासाठी वापरायचा वेगवेगळ्या क्लृप्त्या; ५ वा गुन्हा दाखल

Nashik Captain Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

Bharat Jadhav

  • पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

  • नव्या तक्रारींमुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता

  • SIT आणि पोलिसांकडून तपास अधिक तीव्र

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ, बलात्कार आणि महिलांचे शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. महिलांना वासनेचं शिकार करण्यासाठी खरात वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधायचा. कोणाला शुद्धीकरण, शांती आणि समृद्धीसाठी विधी करायला लावायचा तर कोणाला लग्नाचं आमिष देऊन त्यांचे लैंगिक शोषण करायचा.

अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचं सांगितलं जात आहे. खरातला अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या दररोज नवे गुन्हे दाखल केले जात आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यातून अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आज आणखी २ गुन्हे दाखल झालेत. असे एकूण खरातवर ५ गुन्हे दाखल झाले आहेत. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान अजून कोणी पीडित असतील त्यांनी पोलिसांनी जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. बऱ्याच वेळा समाजात आपली बदनामी होईल म्हणून अनेक महिलांना तक्रार नोंदवत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. अधिक महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहनदेखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. पीडित महिलांनी हेल्पलाईन क्रमांक - 9503270224 / 7775816389 वर संपर्क करत आपली तक्रार दाखल करावी.

एका विवाहित महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी खरातला अटक केली. अनेक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असलेल्या खरातला अटक केली. रविवारी आणखी दोन महिलांनी खरातविरोधात तक्रार दाखल केली. यातील एका घटस्फोटित महिलेची तक्रार तर दुसरी २०२३ मधील एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेची आहे. आतापर्यंत खरातविरुद्ध ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT