पीडित महिलांना घेऊन पोलीस थेट भोंदू बाबा खरातच्या ऑफिसमध्ये, खळबळजनक महिती समोर|VIDEO

Ashok Kharat Case Police Raid Office With Victims Nashik: भोंदू बाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित महिलांना सोबत घेऊन खरातच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली.

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदुबाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात आता पोलिसांनी थेट पीडित महिलांना सोबत घेऊन शहरातील खरातच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. क्राईम ब्रांच पथकाने आज शहरात असलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयात जाऊन तपास केला. याच कार्यालयातून भोंदू अशोक खरात हा जमीनिंचे व्यवहार करायचा. तसेच याच कार्यालयात अनेक महिलांचे शोषण झाल्याचा पोलिसांना संशय असल्याने या ठिकाणाहून मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल रविवारी भोंदू बाबावर तिसरा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला गरोदर असताना वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा काल नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात दाखल झाल्याने आणखी काही महिला देखील पुढे येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com