'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Captain Ashok Kharat Case : नाशिकमध्ये स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे शोषण केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास तीव्र झाला आहे.
Police tighten probe as third case is filed against Ashok Kharat in Nashik.
Police tighten probe as third case is filed against Ashok Kharat in Nashik.
Published On
Summary
  • अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

  • लग्नाचं आमिष दाखवून शोषणाचा आरोप

  • सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचे नव-नवीन खुलासे बाहेर येत आहेत. अशोक खरातच्या विरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर खरातविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता खरातपासून र्गभवती राहिल्याचं सांगण्यात येत आहे.

Police tighten probe as third case is filed against Ashok Kharat in Nashik.
Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं लैगिंक शोषण करणाऱ्या अशोक खरातला चांगलाच खाकीचा दम धाकवला. नाशिक पोलिसांचा पॅटर्न राज्यभरात चर्चेत आहे. आज खरातला नाशिक पोलिसांनी त्याची झलक दाखवली. पोलीस कोठडीत असलेल्या भोंदू बाबाकडून पोलिसांनी 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' वधवून घेतलं.

दरम्यान नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात अशोक खरात विरुद्धात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने तदिलेल्या तक्रारीनुसार खरात हा तिला लग्नाचा आमिष दाखवत तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करत असायचा. ही पीडिता लग्नाच्या आधीपासून त्याच्याकडे जात होते. त्यानंतर तिचा विवाह झाल्यानंतर ती महिला संसारात वाद होत असल्यानं भोंदू खरातकडे दोष निवारणासाठी जात होती.

Police tighten probe as third case is filed against Ashok Kharat in Nashik.
Ashok Kharat: अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा

तेव्हा अशोक खरातने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत लगट करण्यास सुरुवात केली. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केली. यादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली होती. आपलं पितळ उघड पडू नये म्हणून खरातने गर्भपात करण्यासाठी महिलेला औषधही दिलं होतं. खरातने २०२७ पीडित महिलेला तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.

'मी अवतारी पुरुष आहे, तू मागील जन्माची अप्सरा, मला त्रिकाळ ज्ञान आहे, असं सांगत खरात विश्वास संपादन करत होता. तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो, खरात पीडितेला सांगायचा. माझे नशिबात दोन विवाह आहे, तू माझेशी विवाह कर, मी तुला व तुझे मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल, असं खरातने आश्वासन दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com