Nashik Ashok Kharat Update News Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Kharat : महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची करण्यात आली HIV टेस्ट, काय आला रिपोर्ट?

Nashik Ashok Kharat Update News : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा समोर आला असून त्याची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अशोक खरात प्रकरणात HIV टेस्ट निगेटिव्ह

  • नाशिकमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद; ८ गुन्हे दाखल

  • SIT कडून सखोल तपास सुरू

  • महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

अभिजित सोनावणे, नाशिक

गेले काही दिवस महाराष्ट्रात भोंदू अशोक खरात प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणातील दररोज नवनवीन माहिती समोर येत असून भोंदू बाबा अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. या प्रकरणाची चौकशी आता SIT कडे देण्यात आली असून वैद्यकीय तपासात खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

नाशिक मधील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात हा अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याच्या बहाण्याने १५० हून अधिक महिलांवर बलात्कार केला. याप्रकरणी नाशिक पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला आणि खरातची सगळी पायामुळं खणून काढायला सुरुवात केली. याप्रकरणी खरातला अटक करण्यात आली. तसेच खरात विरोधात आतापर्यंत ८ गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांत दाखल झालेल्या ८ गुन्ह्या पैकी ७ गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहे. गुन्हा दाखल केलेल्या महिला व्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाही. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिढीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे.

चौकशी दरम्यान, खरातची दीड वर्षांपूर्वी शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली आणि त्याला अर्धांगवायूचा झटका आला असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. खरातचा भक्त असलेल्या डॉक्टरनेच त्याच्यावर उपचार केले असल्याचे म्हटले जात आहे. आजही खरातच्या एका हाताची हालचाल मर्यादित असून भुवईत बदल दिसून येतो.

अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्हाशी सबंधीत सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात अनेक दिग्गज मंडळी देखील अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आता या प्रकरणी कोणते खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे घेणार नाशिक पोलिस अधीक्षकांची भेट

Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात

Ladki Bahin Yojana: खुशखबर! या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹६००० जमा होणार; ४ महिन्याचा हप्ता एकत्र येणार?

Kumbha Rashi: कुंभ राशी असणाऱ्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा खास राशीभविष्य

Brocoli Salad Recipe: हेल्दी आणि टेस्टी ब्रोकोली सॅलड कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT