Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?

Pune Traffic News : एकविरा देवीच्या यात्रेमुळे लोणावळा परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. जड वाहनांना बंदी असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?
Pune Traffic NewsSaam Tv
Published On
Summary
  • एकविरा यात्रेमुळे लोणावळा परिसरात वाहतूक बदल

  • जड वाहनांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बंदी

  • कार्ला फाटा ते मंदिर मार्ग बंद

  • पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

  • नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक

पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे श्री एकविरा देवीची चैत्र यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी अनेक भक्त दर्शनासाठी येतात. या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

कार्ला फाटाकडून एकवीरा पायथा मंदीराकडे जाणाऱ्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. कार्ला फाटा ते एकवीरा मंदिराच्या पायथापर्यंत जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ, दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?
Thane Water Shortage : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; वाचा सविस्तर

उद्या म्हणजेच २५ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते दुसऱ्यादिवशी रात्री १२ वाजेपर्यंत जुना पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु, टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक वडगाव फाटा ते मुंबई-पुणे महामार्गाने कुसगाव बु. टोलनाका, मुंबई अशी वळविण्यात येणार आहे.

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?
Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जुना पुणे मुंबई महामार्गावरील कुसगाव बु, टोलनाका ते वडगाव फाटा दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून ही वाहतूक पुढे कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा मुंबई-पुणे महामार्गाने वडगाव फाटा, पुणे अशी वळविण्यात येत आहे. जड व अवजड वाहने (भाविकांची हलकी वाहने वगळून) सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com