Maratha Reservation Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: लासलगावमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवला; मराठा बांधवांकडून काळे झेंडे दाखवत 'गो बॅक'च्या घोषणा

Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याचेच पडसाद छगन भुजबळांच्या पाहणी दौऱ्यावर पडल्याचे दिसत असून नाशिकमधील मराठा बांधवांनी भुजबळांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक| ता. ३० नोव्हेंबर २०२३

Nashik Breaking News:

राज्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र मराठा आंदोलकांचा भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. लासलगावमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात सध्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मराठा- ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याचेच पडसाद छगन भुजबळांच्या पाहणी दौऱ्यावर पडल्याचे दिसत असून नाशिकमधील मराठा बांधवांनी भुजबळांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला.

येवला तालुक्यातील नुकसान पाहणी संपवून भुजबळ (Chhagan Bhujbal) निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात होते. भुजबळांचा ताफा लासलगाव मार्गे कोटमगाव मार्गे जात असताना कोटमगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकऱ्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. तसेच ताफा पुढे गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत भुजबळ गो बॅक चे नारे दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलकांमुळे बदलावा लागला मार्ग..

दरम्यान, आजच्या दौऱ्याला सुरूवातीपासूनच मराठा बांधवांनी विरोध केल्याने छगन भुजबळांना आपला मार्गही बदलावा लागला होता. सकाळी छगन भुजबळ नुकसानग्रस्त (Farmer) भागाची पाहणी करण्यासाठी निघाले. विंचूर चौफील येथे मराठा जमले असल्याने पोलिसांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ यांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलून दुसऱ्या मार्गावरुन पाहणी दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT