रुपाली बडवे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ पक्षचिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात काल सुनावणी पार पडली. यावर पुढील सुनावणीसाठी ४ डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. अशात अजित पवार गटाकडून निकाल आपल्याच बाजूने लागणार असं ठापपणे म्हटलं जातंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील याचा पुनरुच्चार केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
निवडणूक आयोगातिल निकाल आपल्या बाजूने लागेल असं आपण बोललो. त्यामुळे काहीजण टीका करत असतात. त्यांना सांगायचं आहे की, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा हा निर्णय असणार आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
उदया निवडणुक आयोगाचा निर्णय लागेल त्यावेळी पेपर फुटला असे म्हटले जाईल. परंतु तुम्हा कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की, हा निर्णय अदृश्य हाताने दिलेला निर्णय नाही तर कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे तळागाळापर्यंत पोहचवायच आहे, अशा शब्दांत तटकरेंनी निकालाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
आयोगाची सुनावणी लांबली जातेय की लांबवली जातेय हे आम्हाला कळत आहे. आता 53 पैकी 43 आमदार आपल्यासोबत आहेत. मतदार संघात जराही विचार न करता सर्व आमदार आमच्या पाठीशी उभे राहिले हे महत्तवाच आहे, असंही सुनील तटकरेंनी म्हटलं.
अजित पवार (Ajit Pawar) यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर काही आरोप केले. यावरून देखील तटकरेंनी म्हटलं की, आजित पवार यांना राजकिय डेंग्यू झाला असे आरोप होत आहेत, अजित पवार ढोंग करणारे नेता नाहीत. आपण बीड कोल्हापूर, बारामतीला गेलो आपलं जोरदार स्वागत झालं कारण विश्वासाहर्ता एका दिवसांत तयार होतं नसते,अशा शब्दांत त्यांनी आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.