NCP Crisis: अजित पवारांना मिळालेलं समर्थन बेकायदेशीर; शरद पवार गटाच्या वकिलांचा युक्तीवाद

NCP Crisis: शिवसेनेप्रमाणे आम्हाला पक्ष द्यावा हा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आलाय. हा दावा खोडून काढण्यासाठी शरद पवार यांच्याकडून युक्तिवाद केला गेला.
NCP Crisis:
NCP Crisis:Saam Tv
Published On

NCP Crisis Sharad Pawar Advocate kamat Argument :

अजित पवार यांना आमदारांनी दिलेलं समर्थन बेकायदेशीर आहे. अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दावा करणे हे कार्य म्हणजे विश्वासघातकीचा प्रकार आहे, असं शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. (Latest News)

अजित पवार गट आणि शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आमच्याकडे जास्त आमदार आहेत. त्यामुळं शिवसेनेप्रमाणे आम्हाला पक्ष द्यावा हा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आलाय. हा दावा खोडून काढण्यासाठी शरद पवार यांच्याकडून युक्तिवाद केला गेला. शरद पवार यांच्याकडून ॲड. देवदत्त कामत हे युक्तीवाद केला असून पुढील व्यक्तीवाद मंगळवारी घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी केलीय.

युक्तीवाद केल्यानंतर आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अ‍ॅड. कामत आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांन माध्यमांशी संवाद साधला. युक्तीवाद करताना आपल्या बाजू आणि समोरील गटाकडून कोणत्या तथ्य मांडण्यात आली याची माहिती कामत यांनी दिली. अजित पवार यांना मिळालेलं समर्थन हे बेकायदेशीर आहे. त्यांनी केलेले कृत्य हे विश्वासघातकी असल्याचं कामत म्हणाले. तर आमदारांना मिळालेलं मतदान हे पक्षाची भूमिका आणि माझ्यावर असलेल्या विश्वासमुळे मिळाली असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करण्यात आलाय. या वाद आता निवडणूक आयोगासमोर आला असून याप्रकरणी सुनावणी चालू आहे. विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी ३१ जानेवारीच्या आत निर्णय द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय.

पक्ष आणि चिन्हाप्रकरणी निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाकडून आपली बाजू मांडण्यात आली. शरद पवार गटाकडून युक्तीवाद करताना अॅड. देवदत्त कामत यांनी अनेक दाखले देत निवडणूक आयोगाला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवदत्त कामत यांच्याकडून सादिक अली केसाचा दाखला दिला गेला. याचबरोबर अर्जुन सिंह विरूद्ध कॉंग्रेस या प्रकरणात निवडणूक आयोगात दिलेला निकाल, यासह शरद यादव यांच्या संयुक्त जनता दल यांच्या संदर्भात दिलेल्या निकालाचा दाखला शरद पवार गटाकडून आयोगासमोर दिला गेला.

NCP Crisis:
Maharashtra Politics: महायुतीतल्या लोकसभेच्या ९ जागांसाठी अजित पवार गट आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com