Anil Deshmukh News: माजी मंत्री अनिल देशमुख पोहचले बांधावर; नुकसानग्रस्त शेत पिकाची केली पाहणी

Amravati News : दुष्काळी परिस्थिती सर्वत्र असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकरी हतबल झाला आहे
Anil Deshmukh
Anil DeshmukhSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, ज्वारी या पिकांना अधिक फटका बसला असून (Farmer) शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज थेट शेताच्या बांधावर पोहचत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. (Tajya Batmya)

Anil Deshmukh
Dombivali News : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात

राज्यात सर्वदूर अवकाळी पाऊस बरसात आहे. या पावसामुळे शेतात उभी असलेली ज्वारीची पीडा आडवे झाले आहे. तर बहुतांश भागात वाचनावर आलेला कापसाचे बोन्ड पावसामुळे खराब झाले आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अर्थात दुष्काळी परिस्थिती सर्वत्र असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची (Farmer) शेतकरी हतबल झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anil Deshmukh
Lightning Strike: अवकाळीने घेतला शेतकऱ्याचा बळी; पाली गावात वीज पडून मृत्यू

मागील दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज केली आहे. अमरावती शहरा लगत असलेल्या वलगाव शेत शिवारात त्यांनी जाऊन पावसामुळे खराब झालेल्या कपाशी, तुरसह अन्य पिकांची पाहणी केली. यावेळी राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com