Dombivali News : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात

Dombivali News : नागरिकाना त्याने शेअर मार्केटवरील गुंतवणूकीवर १० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
डोंबिवली
: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दहा टक्के फायदा देण्याचे प्रलोभन द्यायचा. नागरिकांना गाठून (Dombivali) फायदा करून देण्याचे आमिष दाखवत दीडशेहून अधिक लोकांना चार कोटी ६० लाख रुपयाचा चुना लावला. याबाबत प्राप्त तक्रारीवरून डोंबिवली रामनगर पोलिसांनी (police) कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. विनय वरटी असे या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

Dombivali News
Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार हेकटरवरील पिकांचे नुकसान

शेअर मार्केटिंगसाठी विनय वरटी याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंगचे कार्यालय सुरू केले होते. सुरुवातीला नागरिकाना त्याने शेअर मार्केटवरील गुंतवणूकीवर १० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी (Fraud) पडत जवळपास दीडशेहून अधिक नागरिकांनी त्याला पैसे दिले. गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या झेरॉक्ससाठी तब्बल ४२ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती मिळाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivali News
Rohit Pawar News : स्वार्थासाठी बाहेर पडलेल्यांकडे आगामी काळात पक्ष नसेल; आमदार रोहित पवार

पाच जणांचा समावेश 

गुन्हा दाखल झाल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोपी विनय डोंबिवलीमधून फरार झाला. मात्र पुण्यात लपून बसल्याचे माहिती डोंबिवलीतील रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील विद्यापीठ परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये त्याच्यासह अजून पाच जणांचा समावेश असून यापैकी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com