Bhujbal News : राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली राजीनाम्याची मागणी, छगन भुजबळांनी दिलं एका वाक्यात उत्तर

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ मराठा-ओबीसींमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतो आहे. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडण्याचा खोचक सल्ला दिला होता. विखे-पाटील यांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalYandex
Published On

Chhagan Bhujbal Replied To Vikhe Patil :

जर मला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा निरोप आला तर बस संपला विषय, असं म्हणत ओबीसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी विखे- पाटील यांना उत्तर दिलंय. नाशिक येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (Latest News)

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेती आणि इतर पिकांचे नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस झालेल्या भागाला मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देत तेथील द्राक्ष शेतींची पाहणी केली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीला उत्तर दिलं. जर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा निरोप आला तर आपण राजीनामा देऊ असं म्हणत भुजबळ यांनी एका वाक्यात हा वाद संपवला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकमध्ये अनेकदा येतो मतदारसंघात गेलो नव्हतो. तिकडून अवकाळी पावसाचे फोटो मेसेज येतात. त्यामुळे मी गेलो, माहितीये तिकडे गावबंदी पण नुकसान झालंय त्याची पाहणी केली गेली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. राज्य मत्रिमंडळाची बैठक झाली त्यात अवकाळी पावसावर चर्चा झाली कांदा द्राक्ष उत्पादक अन्य यांना मदत व्हावी. अन्य पीक ६ महिन्यांनी घेता येईल, पण द्राक्षाला शक्य नाही, त्यामुळे द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळी मदत करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

निरोप आला तर बस विषय संपला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे- पाटील आणि ओबीसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र द्यावे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु जरांगे-पाटील यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय.

ओबीसी समाजाच्या आरक्षण कमी होण्याची भीती वर्तवत त्यांनी मराठा समाजाच्या मागणीला विरोध केला. त्याचवेळी छगन भुजबळ मराठा-ओबीसींमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतो आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडण्याचा खोचक सल्ला दिला होता.

काय म्हणाले होते विखे-पाटील

कोल्हापूर दौऱ्यावर असताना विखे यांनी माध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला होता. ओबीसीचा मुद्दापुढे करून आंदोलन सुरू आहे, पण याची गरजच नव्हती. विनाकारण दोन समाजामध्ये ओबीसीविरुद्ध मराठा सुरू असलेला वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत, नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. अन्यथा सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा मेसेज जातोय असं विखे म्हणाले होते.

Chhagan Bhujbal
Pune News: भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या, अन्यथा... मराठा पदाधिकाऱ्याने सुनावलं; पुण्यात नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com