Pune News: भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या, अन्यथा... मराठा पदाधिकाऱ्याने सुनावलं; पुण्यात नेमकं काय घडलं?

Chhagan Bhujbal vs Maratha Community: मराठा पदाधिकाऱ्यांनी थेट पुण्यातील शासकीय विश्रामगृह गाठून मंत्री छगन भुजबळ यांना चांगलंच सुनावलं आहे.
Chhagan Bhujbal vs Maratha Community
Chhagan Bhujbal vs Maratha Community Saam TV
Published On

Chhagan Bhujbal vs Maratha Community

सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता या युद्धात मराठा संघटनांनी देखील उडी घेतली आहे. आज मराठा पदाधिकाऱ्यांनी थेट पुण्यातील शासकीय विश्रामगृह गाठून मंत्री छगन भुजबळ यांना चांगलंच सुनावलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhagan Bhujbal vs Maratha Community
Jalgaon Accident News : देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

छगन भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या. आमच्या लेकराबाळांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या आड येऊ नका. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका. अन्यथा या गोष्टी हाताबाहेर जातील, असा इशाराच स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव छगन भुजबळ यांना दिला आहे.

इतकंच नाही तर, धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडीजवळ येऊन त्यांना आव्हान दिलं. माझ्यासमोर भुजबळ यांची गाडी उभी आहे, वेळ पडली तर ती फोडून त्यांचा निषेध केला जाऊ शकतो, ओबीसीच्या नेत्यांना विनंती आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय जाधव यांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी बांधव देखील आक्रमक झाले आहेत. आमच्या दैवताला जर कुणी इशारा देत असेल, तर त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल, असं ओबीसींनी म्हटलं आहे.

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात छगन भुजबळ ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असताना पोलिसांनी धनंजय जाधव यांना आतमध्ये सोडलंच कसं? असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

धनंजय जाधव यांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी बांधव देखील आक्रमक झाले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत वाद मिटवला. सध्या शासकीय निवास्थानाबाहेर तणावपूर्ण शांतता आहे.

Chhagan Bhujbal vs Maratha Community
Maharashtra Rain: राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; अनेक जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा, शेतकऱ्यांची धावपळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com