Ashok Kharat Case Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Nashik Ashok Kharat Case: नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. या महिला अधिकाऱ्यांनी अशोक खरातला प्रशासकीय पातळीवर मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Siddhi Hande

अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट

आणखी एक महिला अधिकारी रडावर

अशोक खरातला मदत केल्याचा संशय

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही प्रतिनिधी

भोंदू अशोक खरात प्रकरणात अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता या प्रकारणात एक महिला अधिकारी रडारवर आहेत. SIT तपासात याबाबत माहिती उघड झाली आहे. दरम्यान, या माहितीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरणात महिला अधिकारी रडारवर

SIT तपासात या तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा भोंदू अशोक खरातशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू अशोक खरातला मदत केल्याचा संशय आहे. त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला पाहिजे असलेली पोस्टिंग मिळवून दिली आहे. या महिला अधिकाऱ्याचे काळे पैसे देखील खरातने पांढरे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे.

भोंदू अशोक खरातवर १२ गुन्हे दाखल (Ashok Kharat Case)

भोंदू अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. त्याच्यावर एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. एसआयटी काय तपास करते हे रोज सांगता येणार नाही. याबाबत माहिती योग्यवेळी सांगेन. सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवा.या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी केली जाईल. ईडीने यासंदर्भात माहिती घेऊन कारवाई सुरु केली आहे.या प्रकरणातील दोशींवर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT