Heath Tips : तोंडातून दुर्गंधी येतेय, किडनीशी काय आहे संबंध?

Natural blood pressure remedies : रोज नियमित दात घासून आणि तोंडाची स्वच्छता राख करूनही जर तोंडाला सतत दुर्गंधी येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. हे लपलेले लक्षण शरीरातील बिघडलेल्या किडनीचे असू शकते.
kidney disease bad breath,
kidney disease bad breath,saam tv
Published On: 

अनेकांना नियमित ब्रश करूनही तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या जाणवते. अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा केवळ दातांची समस्या समजून त्यावर उपाय केले जातात. मात्र, तोंडातून सतत दुर्गंधी येण्यामागे किडनीशी संबंधित आजारही कारणीभूत असू शकतो. विशेषतः श्वासाला अमोनियासारखा किंवा लघवीसारखा वास येत असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. किडनीचे कार्य व्यवस्थित सुरू नसल्यास शरीरातील युरिया आणि इतर टाकाऊ घटक रक्तात जमा होऊ लागतात. या स्थितीला 'युरेमिया' असे म्हणतात.

kidney disease bad breath,
Health Tips : BP वाढू द्यायचा नसेल तर आजपासूनच करा हे ५ बदल! हृदयाचे आरोग्य राहील चांगले

रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यानंतर तोंडातील जीवाणू त्याचे विघटन करून अमोनिया तयार करतात. त्यामुळे श्वासाला विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येऊ शकते. वैद्यकीय भाषेत या समस्येला 'युरेमिक फेटर' म्हणतात.

तोंडाच्या दुर्गंधीसोबत ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा

  • तोंडातून सतत दुर्गंधी येण्यासोबत काही शारीरिक बदल जाणवत असतील तर किडनीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

  • पाय, घोटे आणि चेहऱ्यावर सूज येणे.

  • लघवीमध्ये जास्त प्रमाणात फेस दिसणे.

  • कोणतेही विशेष काम न करता थकवा जाणवणे.

  • त्वचेवर सतत खाज येणे.

  • श्वासाला अमोनियासारखा वास येणे.

kidney disease bad breath,
Kichen Tips : तांदूळ आणि डाळीत किडे झालेत? फेकून देण्याआधी करा हे 5 सोपे उपाय; धान्य राहील सुरक्षित!

किडनीची स्थिती तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

किडनीच्या कार्यक्षमतेची माहिती मिळवण्यासाठी सीरम क्रिएटिनिन, ईजीएफआर आणि ब्लड युरिया या रक्ताच्या चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. याशिवाय लघवीतील अल्ब्युमिन तपासणीही किडनीच्या आजाराचे निदान करण्यासाठी उपयुक्त असते.

प्रत्येक वेळी दुर्गंधी म्हणजे किडनीचा आजार नाही

तोंडाला दुर्गंधी येण्यामागे दातांची अस्वच्छता, हिरड्यांचे आजार, जीभेवर साचलेले जीवाणू, तोंड कोरडे पडणे किंवा काही खाद्यपदार्थही कारणीभूत असू शकतात. त्यामुळे केवळ दुर्गंधी येते म्हणून किडनीचा आजार असल्याचा निष्कर्ष काढू नये. मात्र, ही समस्या दीर्घकाळ कायम राहिल्यास आणि इतर लक्षणेही जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या कराव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.