Ashok Kharat sexual exploitation case full details Maharashtra : अशोक खरात यानं ५ महिलांचे लैंगिक शोषण केले, ८ महिलांचे ३५ अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. भोंदू खरात याने अनेक महिलांसोबत अश्लील चाळे आणि छळ केल्याचे उघड झाल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. नाशिकच्या भोंदू खरात याच्या काळ्या कृत्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. खरात प्रकऱणाचे पडसाद महाराष्ट्राच्या सभागृहात पाहायला मिळाले. विरोधकांच्या तिखट प्रश्नांची देवेंद्र फडणवीस यांनी सखोल उत्तरे देत या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
अशोक खरात यांचे ८ महिलांसोबतचे ३४ व्हिडिओ आहेत. अशोक खरात यांनी महिलांशी अश्लील चाळे तसंच छळ केल्याच उघड झालं आहे. आरोपी खरात यानं देश सोडून जाण्याची तयारी केली होती. आम्ही लूक आऊट नोटीस काढली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अशोक खरात यानं अमानुष अघोरी प्रथेचा वापर केला. महिलांची फसवणूक केली. खरात यांच्यावर छापे टाकले आणि चौकशी सुरू केली त्यात सहा लाख रुपये रोख, दोन लॅपटॅाप आणि फार्म हाऊस वर काडतूस सापडल्याची माहितीही त्यांनी दिली.
पिडीत आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यांच्यासोबत असलेले पुजारी आणि इतर लोकांचेही जबाब घेतले आहेत. चार पिडीत महिलांचे जबाब घेऊन पाच गुन्हे दाखल केले आहेत. पिडीत महिला तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. फेसबुक व्हिडिओ बंद करण्याचे सांगितले आहे आणि न्यूज चॅनेल यांना ही नोटीस दिल्या आहेत. खरात सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार आहे का, याची चौकशी केली जात आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यंत्र्यांनी सभागृहात खरात याच्या संपत्तीची माहिती दिली आहे. मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, नवी मुंबई, पुणे या ठिकाणी त्यांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. त्याशिवाय शिवनिका संस्थानची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक खरात महिलांना "मंतरलेले पाणी" किंवा "मिठाई" देऊन गुंगी आणायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. स्वतःला "शंकराचा अवतार" सांगून किंवा "तुझ्या मुलांचे वाटोळे होईल" अशी भीती घालून तो महिलांना धमकावत होता. कार्यालयात नकली साप किंवा वाघ दाखवून भीती घालणे आणि महिलांना लघवी पाजणे यांसारखे अघोरी प्रकारही त्याने केल्याचे तपासात उघड झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. खरातच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी तो मुंबईतील सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे ते म्हणाले.
खरातने एका पीडित महिलेला तांब्याच्या बाटलीतील "मंतरलेले पाणी" देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यामुळे ती महिला गरोदर राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. महिलांना "दैवी शक्ती" आणि "शुद्धी" करण्याच्या नावाखाली बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. खरात महिलांना लघवी पाजणे, अंगावर हात फिरवणे आणि भीती घालण्यासाठी नकली साप किंवा वाघ दाखवणे यांसारखे अघोरी प्रकार करायचा, असे फडणवीस म्हणाले.
आतापर्यंत खरातविरुद्ध एकूण ८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ७ गुन्हे एसआयटी (SIT) कडे असून १ गुन्हा नाशिक शहर गुन्हे शाखेकडे आहे. महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खरातच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी तो मुंबईतील सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच जप्त केलेल्या पेनड्राइव्हमधील व्हिडिओच्या आधारे इतर पीडित महिलांचा शोध सुरू आहे. ज्या साक्षीदाराने अश्लील कृत्यांचे व्हिडिओ पोलिसांना दिले, त्याला पोलीस संरक्षण पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.