Aurangabad, Ambadas Danve, Narendra Trivedi saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Political News : 'सगळी पदं अंबादस दानवेंना हवीत'

आगामी काळात औरंगाबाद जिल्ह्यात गावा गावात कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाईल असे नमूद केेले.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Political News : सगळी पद आपल्यालाच मिळावी असा अट्टाहास विराेधी पक्ष नेते अंबादस दानवे (Ambadas Danve) यांचा असल्याचा आराेप शिवसेना (Shivsena) ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी (Narendra Trivedi) यांनी आज औरंगाबाद येथे केला. अनेक पदाधिकारी परतीच्या मार्गावर आहेत परंतु केवळ दानवेंमुळे ते येत नसल्याचेही त्रिवेदींनी नमूद केले.

त्रिवेदी म्हणाले औरंगाबाद येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची हुकूमशाही सुरू आहे. सर्व पदं त्यांनाच पाहिजे. खैरे यांना पाडण्यासाठी त्यांचाच पुढाकार होता असा गाैप्यस्फाेट देखील त्रिवेदींनी केला. आताही त्यांना जिल्ह्याची खासदारकी पाहिजे. त्यामुळे खालच्या पदावर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांवर त्याची हुकूमशाही दिसून येत आहे असा गंभीर आरोप शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी केला.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दानवे यांच्यावर नरेंद्र त्रिवेदी यांनी हल्ला चढवला. यावेळी ग्रामीण मधील काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी राजेंद्र जंजाळ (शिंदे गट जिल्हाध्यक्ष) यांनी (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाटचाल करीत आहेत. आगामी काळात औरंगाबाद जिल्ह्यात गावा गावात कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाईल असे नमूद केेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT