Taloda News Saam tv
महाराष्ट्र

Taloda News : नरभक्षक बिबट्याचा पुन्हा हल्ला; मैत्रिणीसोबत मका आणायला गेलेल्या बालिकेचा मृत्यू

Nandurbar News : दीपमाला ही आपल्या मैत्रिणीसोबत आज सकाळी रेवानगर येथील तिचे आजोबाच्या मक्याच्या शेतात मक्का घेण्यासाठी गेली होती. शेतात मका तोडण्यासाठी शेतात घुसली असतानाच बिबट्याने हल्ला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: तळोदा तालुक्यात गणेश बुधवल येथे काल एका महिलेवर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. सदरची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेतात मका घेण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालिकेवर हल्ला करत तिला शेतात फरफटत नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सलगच्या होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने तळोदा तालुका हादरला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सदरची घटना घडली असून चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली दीपमाला नरसिंग तडवी (रा. सरदार नगर) असे घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. दीपमाला ही आपल्या मैत्रिणीसोबत आज सकाळी रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मक्याच्या शेतात मक्का घेण्यासाठी गेली होती. शेतात मका तोडण्यासाठी शेतात घुसली असतानाच बिबट्याने हल्ला चढविला. 

शेतातून नेले फरफटत 

शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दिपमाला हिच्यावर झडप घातली. तिला पकडून मक्याच्या शेतातून ५० मीटर अंतरावर फरफटत नेले. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर, कानाजवळ जबर जखमी करत तिला जागीच ठार केले. दीपमाला हिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण भयभीत झाली होती. यानंतर तिने घरी जाऊन घटना सांगितली. यानंतर ग्रामस्थ शेताच्या दिशेने धावत आले असता त्यांना दीपमाला हिचा मृतदेह आढळून आला.  

बापाचा आक्रोश 

चिमुकलीचा मृत्यूदेह पाहून बापाला अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी आलेल्या बापाने एकच आक्रोश केला. दरम्यान काल एका ४५ वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केले. लागोपाठ नरभक्षक बिबट्याने दोन जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे.

शिवार बिबटमुक्त करण्याची मागणी 

नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधी कोणाचा बळी पडेल या भितीने शेत शिवारात वावरणारे बिबट्याचा प्रचंड दहशतीने घाबरले आहेत. तळोदा तालुक्यातून बिबट हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी. वनविभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता. शेत शिवारातील बिबटमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शेत शिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे. नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वनविभागाच्या कामगिरीवर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT