Nandurbar Fire : वनव्याने संसाराची राखरांगोळी; जळालेले घर पाहून आदिवासी कुटुंबाचे अश्रू अनावर

Nandurbar News : रोज मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान मेहनतीने कमावलेली जमापुंजी काही क्षणात राख झाली आहे. धडगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावातील कारभारी पाढे येथील घटना आहे
Nandurbar Fire
Nandurbar FireSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात आग लागल्याच्या घटना घडत असतात. यात पक्षांचा मृत्यू होत असतो. मात्र डोंगरात लागलेल्या आगीमुळे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना घडली आहे. या आगीत घर पूर्णपणे जळून राख झाले आहे. दरम्यान जळालेले घर पाहून आदिवासी कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते. घर जळल्याने परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधव होळी सण उत्साहाने साजरा करत असतात. नुकताच होळीचा सण साजरा झाला असून यानंतर आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आगीच्या घटनेत हरसिंग कोंड्या वळवी असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. हरसिंग यांची डोंगराळ परिसरात झोपडी आहे. रोज मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान मेहनतीने कमावलेली जमापुंजी काही क्षणात राख झाली आहे. धडगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावातील कारभारी पाढे येथील घटना आहे. 

Nandurbar Fire
Hingoli News : पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी, वर आलाच नाही; पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

संसार उघड्यावर 

मागील एका महिन्यापासून तालुक्यातील डोंगरदऱ्यामध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले असून ठीकठिकाणी जंगलातील सुकलेल्या चाऱ्याला आग पेटत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून या लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे लागलेल्या या आगीमुळे आदिवासी कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 

Nandurbar Fire
Ahilyanagar Crime : दारू पिऊ देण्यास विरोध; टोळक्याचा हॉटेलवर हल्ला, पाच जण जखमी

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी धाव घेत मिळेल त्या भांड्यात पाणी आणून आग विझवण्याच्या प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्या कारणाने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. तर आगीमध्ये संपूर्ण घर आणि घरात ठेवलेल्या वस्तू जळून राख झाल्या आहेत. यात घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे, रोख रक्कम, धान्य जळून राख झाल्याने कुटुंब उघड्यावर आले. आदिवासी कुटुंबाना अश्रू अनावर झाले. लहान बालकांना आपल्याला हृदयाशी लावत बापाने आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com