Hingoli News : पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी, वर आलाच नाही; पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Hingoli : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडी गावापासून पूर्णा नदीचा कॅनॉल गेलेला आहे. याच कॅनॉलमध्ये तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंडगव्हाण येथील अभय सूर्यवंशी (वय १९) असे या युवकाचे नाव आहे
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडी गावाच्या परिसरात कॅनॉलमध्ये गावातील काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारली मात्र सदर तरुण वर आलाच नाही. कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या प्रवाहासोबत तरुण वाहून गेल्याने बेपत्ता झाला. दरम्यान शोध मोहिमेनंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. 

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडी गावापासून पूर्णा नदीचा कॅनॉल गेलेला आहे. याच कॅनॉलमध्ये तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंडगव्हाण येथील अभय सूर्यवंशी (वय १९) असे या युवकाचे नाव आहे. दरम्यान धरणातील पाणी पूर्णा नदीत सोडल्याने कॅनॉलमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दरम्यान शनिवारी दुपारी अभय सूर्यवंशी हा कॅनॉलमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी या परिसरात गेला होता. 

Hingoli News
मला हाल हाल करुन मारतील, बीडमधील आत्महत्या केलेल्या शिक्षकाची फेसबुक पोस्ट; 'त्या' तीन मुंडेंच्या नावाचा उल्लेख

सोबत असलेल्या सर्व मित्रांसोबत अभयने देखील कॅनलमध्ये पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र बाकीचे सर्व मित्र बाहेर निघाले. अभय हा पाण्यात खालीच राहिला व अचानक बेपत्ता झाला होता. सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही. यामुळे घटनेची माहिती गावात देण्यात आली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर जीवरक्षक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अभयचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. 

Hingoli News
Latur Crime : सलग दोन खूनाच्या घटनांनी लातूर हादरले; पोलीस स्टेशनच्या गेटवरच हत्या

२४ तासानंतर सापडला मृतदेह 

दरम्यान या घटनेनंतर वाहून गेलेल्या अभय सूर्यवंशीचे कुटुंब देखील काळजीत पडले. चंदगव्हाण येथील ग्रामस्थांनी या परिसरात तळ ठोकत पोलीस व जीवरक्षक दलाच्या जवानांसोबत अभयचा शोध घेणे सुरू केले आहे. मागील २४ तासापासून पोलीस प्रशासन जीवरक्षक दलाचे जवान व स्थानिक ग्रामस्थ अभय सूर्यवंशी याचा शोध घेत असून आज सकाळच्या सुमारास अभयचा मृतदेह सापडून आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com