Nandurbar News  Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात आजी आणि नातूचा मृत्यू; तळोदा तालुक्यातील घटना

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असल्याने येथे वन्य प्राण्यांचा नेहमी अधिवास असतो.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात एका शेतात रखवालदार म्हणून काम करणारी 50 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करत जीवेठार मारले आहेत. तर आजीच्या शोधात गेलेल्या नातवावर देखील बिबट्याने हल्ला करत जीवे मारले.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असल्याने येथे वन्य प्राण्यांचा नेहमी अधिवास असतो. तर अनेकदा बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. शहादा तालुक्यातील चिखली येथे दोन बालकांवर बिबट्याने केल्याची घटना घडली असतानाच तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केल्याची घटना समोर आली आहे. पन्नास वर्षीय साकरा खेमा तडवी ह्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होत्या. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत जंगल परिसरात घेऊन जात जीवे मारले. 

आजीच्या शोधात गेलेल्या नातूलाही केले भक्ष 

आजी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा नऊ वर्षीय नातू श्रावण शिवाजी तडवी हा आजीला शोधायला शेतात गेला. मात्र, त्याच्यावर देखील बिबट्याने हल्ला करून त्याच्याही जीव घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचे बंदोबस्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

Maharashtra Live News Update : आता लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे; गॅझेट प्रक्रिया सोमवारपासून

Nail Care At Home : नखं वाढवल्यावर तुटतात? मग नखं मजबूत करण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT