सागर निकवाडे
नंदूरबार : झणझणीत, चवदार आणि रंगदार यासाठी नंदूरबारची मिरची देशभरात प्रसिद्ध आहे. मिरचीचे आगार म्हणून (Nandurbar) नंदूरबारकडे बघितले जाते. दरवर्षी नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार (Bajar Samiti) समितीत लाखो क्विंटलने मिरचीची आवक होते. मात्र ७ वर्षानंतर सन २०१७–१८ नंतर सर्वाधिक विक्रमी उत्पादनाची नोंद झाली आहे. मिरचीवर असलेल्या चुरडामुरडा यासह विविध आजारांवर मात करत प्रतिकूल परिस्थितीतही मिरची उत्पादकांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी लाखो क्विंटल मिरचीची आवक होते. गेल्या वर्षी तब्बल २ लाख १० हजार क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झाली होती. तर सन २०२० मध्ये निसर्गाचा फटका बसलेला असतांनाही १ लाख क्विंटलहून अधिकची आवक झाली होती. नंदुरबारच्या मिरचीचा ठसका देशभर प्रसिद्ध आहे. यामुळे देशभरातून अनेकजण येथे मिरची खरेदीसाठी येतात. यंदा मिरचीच्या सुरुवातीच्या हंगामात प्रचंड तेजी होती. ओल्या लाल मिरचीला ६ हजार ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. तर त्याच मिरचीला आता ३ हजार ८०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली.
उत्पादनात घट तरीही..
मिरचीवर यंदा चुरडामुरडा (घुबडा) आजाराचा प्रादूर्भाव झाला होता. त्यावर मात करत मिरची उत्पादकांनी विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ढगाळ वातावरण आणि निसर्गाचा लहरीपणा त्यातच घुबडाचा प्रादूर्भाव यामुळे मिरचीच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षाचा विक्रम मोडीत काढत अखेरपर्यंत सुमारे २ लाख २५ हजार क्विंटल मिरचीची आवक नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे.
१०५ कोटींची उलाढाल
मिरची हंगाम संपुष्टात आला असून यंदा २ लाख २५ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. यंदा मिरचीला मिळालेले दरदेखील विक्रमी असल्याने मिरचीच्या खरेदी-विक्रीतून झालेली उलाढाल तब्बल १०५ कोटींहून अधिकचा आहे. त्यातच मार्चअखेर संपणारा मिरची हंगाम यंदा मे अखेरपर्यंत सुरू असणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.