Sanjay Raut on Lok Sabha Election 2024: आमचा लोकसभेत खासदारांचा १९ आकडा कायम राहणार; संजय राऊतांचा मोठा दावा

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV
Published On

Sanjay Raut News: लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. भाजपनंतर महाविकास आघाडीने आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत सध्याच्या राज्यातील परिस्थितीवर म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरेंचे हिदुंत्व हे वीर सावरकरांच्या विचारांचं होतं. आता भाजपला अचानक वीर सावरकर आठवू लागले आहेत. यांनी हिंसाचार घडवणाऱ्या टोळ्या निर्माण केल्या आहेत. तुम्ही रामनवमीच्या निमित्ताने काय झालं, हे तुम्हाला माहीत असेल'.

Sanjay Raut News
Cordelia Cruz Drug Case: आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकलं, चौकशी अधिकाऱ्याचा मोठा दावा

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'त्र्यंबकेश्वरची घटना खोटी आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावातील लोकांनी हा डाव उधळून लावला आहे. त्याचे मी अभिनंदन करतो'. तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'महाविकास आघाडीची पहिली बैठक शरद पवारांच्या नेतृत्वात झाली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे अनेक बडे नेते उपस्थित होते. आमचे संसदेत १९ खासदार आहेत. आमचा लोकसभेत यापुढे देखील हा आकडा कायम राहीन'.

राज्यातील हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, ' अकोला, शेवगावमधील हिंसाचार हे भाजप आणि त्यांच्या जवळच्या माणसांचं काम आहे. कर्नाटकातही असा प्रयत्न झाला. पण तेथील लोकांनी त्यांना फेकून दिलं. हिंसाचार करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या'.

Sanjay Raut News
Trimbakeshwar Temple Entry Row: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणात नवा ट्विस्ट; महंत अनिकेत शास्त्री महाराजांनी केला खळबळजनक दावा

देवेंद्र फडणवीसांच्या आमच्याकडे १६ राज्य आहेत, त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'या देशामध्ये ३६ राज्ये आहेत. त्याच्या तुलनेत १६ राज्ये कमी झाली. त्यांच्याकडे बिहार, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक , तेलंगणा , पश्चिम बंगाल राज्ये नाही आहेत, अशी किती नावे घेऊ. महाराष्ट्र दगाबाजीने राज्य घेतलं. त्यांच्याकडे गुजरात, उत्तर प्रदेश आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com