Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : मुसळधार पावसाने सातपुड्यातील निझरा नदीला पूर; प्रवाशांनी भरलेली गाडी पुराच्या पाण्यात अडकली

Nandurbar News : सावरपाडा आणि धनपूर या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम निधीअभावी आठ महिन्यांपासून रखडले असून अर्धवट राहिलेल्या पुलामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  

नंदुरबार : नंदुरबारच्या सातपुडा परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लागली. या पावसामुळे सातपुड्यातून वाहणाऱ्या निझरा नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून गाडी काढण्याचा प्रयत्न करत असताना प्रवाशांनी भरलेली गाडी बंद पडून अडकली होती. यामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता. दरम्यान अन्य गाडीच्या मदतीने पुरात अडकलेली गाडी बाहेर काढण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धनपूर ते सावरपाडा दरम्यान आठ महिन्यापासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदरील पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे ते अपूर्ण अवस्थेत आहे. हा पूल निझरा नदीवर उभारण्यात येत आहे. निझरा नदीचे पात्र मोठे असल्याने पुलाची लांबी १० मीटर असून सात गाळ्यांचा पूल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सावरपाडा व धनपूर येथील ग्रामस्थांना अशाच पद्धतीने प्रवास करावा लागत होता. 

ग्रामस्थांच्या मदतीने काढले वाहन 

सातपुड्याच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने निझरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे धनपूर व सावरपाडा दरम्यान अडकलेले ग्रामस्थ व नागरिक पुराच्या पाण्यात उडी टाकून निघतांना दिसत आहेत. दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती. यावेळी येथे उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या कसरतीनंतर चारचाकी वाहनाला काढण्यात यश आले. 

पुलाचे काम अपूर्ण असल्याने जीवघेणा प्रवास 

एकीकडे प्रशासनाने पत्रक काढून मोड, सावरपाडा, मोठा धनपूर व छोटा धनपूर ह्या गावांतील नागरिकांना धनपूर धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुणाही नदी पात्रात जाऊ नये अशी सूचना केली आहे. परंतु नदीचे पात्र पार करण्यासाठी पुल अर्धवट असल्याने ग्रामस्थांना नाईलाजास्तव नदीमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सदरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT