Latur Accident : लातूरमध्ये हिट अँड रन; मद्यधुंद कार चालकाने महिलेला उडविले, उपचारादरम्यान मृत्यू

Latur News : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे महिलेचे नातेवाईक संतप्त झाले असून, सदर कार चालक आरोपी डॉ. महेश पाटील याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे
Latur Accident
Latur AccidentSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: लातूर शहरात हिट अँड रनचा थरार घडला होता. रस्त्याने जात असलेल्या महिलेला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने जोरदार धडक देत उडविले होते. यात महिला गंभीर जखमी झाली होती. साधारण महिनाभरापासून महिलेवर उपचार सुरु असताना आज अखेर महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी कार चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

लातूरच्या औसा बायपास मार्गावर हा हिट अँड रनचा थरार घडला होता. यात भरधाव येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका महिलेला धडक देत उडविले होते. यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या अपघातात कार चालक डॉक्टर असून मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली होती. सदर अपघात प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आलेली होती. 

Latur Accident
Online Fraud : बनावट लिंक पाठवून घातला गंडा; पिता पुत्राची १६ लाख रुपयांत फसवणूक

मृत्यूशी झुंज अखेर थांबली 

दरम्यान मागच्या एक महिन्यापासून अपघातात जखमी असलेल्या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र आज या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे महिलेचे नातेवाईक संतप्त झाले असून, सदर कार चालक आरोपी डॉ. महेश पाटील याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Latur Accident
Jintur Crime : आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्याकाठ्या अन् लोखंडी रॉडने मारहाण, आठ जण जखमी

भरधाव कार ट्रकवर धडकली 

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वर खामगाव जवळ वळण मार्गावर कार व ट्रकचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे येथून नागपूरच्या दिशेने जाणारी भरधाव कार अपघातग्रस्त ट्रकवर धडकून भीषण अपघात झाला. अपघातात कार मधील दोघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com