Online Fraud : बनावट लिंक पाठवून घातला गंडा; पिता पुत्राची १६ लाख रुपयांत फसवणूक

Dharashiv News : वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन फिर्यादीचा विश्वास संपादन करत बनावट योजनेत गुंतवले व आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण तुळजापूरमधून समोर आले, या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. लिंक पाठवून त्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार तुळजापूरमध्ये समोर आला आहे. यामध्ये वडील आणि मुलाला ऑनलाईन गंडा घालण्यात आला असून तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. 

वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार नवीन राहिले नाहीत. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे फंडे वापरत आमिष दाखवत समोरच्याला विश्वासात घेतले जात असते. त्यांचा विश्वास संपादन करत पैशांची लुबाडणूक करण्यात येत असते. असाच प्रकार धाराशिवच्या तुळजापूर मधील पिता पुत्राबाबत घडला असून अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Online Fraud
Nandurbar Ganesh Festival : साचा न वापरता काळ्या मातीने साकारतात गणराय; १३१ वर्षाची परंपरा आजही कायम

लिंकवर क्लिक करताच रक्कम गायब 

कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला संशयितांनी संपर्क साधला. यानंतर त्यांना अधिक पैशाचे आमिष दाखवले. यानंतर एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअँपवर पाठवत माहिती भरण्यास सांगितले. या लिंकद्वारे पिता पुत्राची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन फिर्यादीचा विश्वास संपादन करत बनावट योजनेत गुंतवले व आर्थिक फसवणूक केली.  

Online Fraud
Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

सायबर पोलिसात तक्रार दाखल 

खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे गवळी यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली असुन पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान अनोळखी व्यक्तींनी संपर्क करून दिलेल्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com